Image
0

बेवफाई

textgram (16)

Advertisements
0

नातं ..

180

Friends ->love ->friends

 

मी तू आणि आपली मैत्री,
असं हे आपल्या मैत्रीचं सुंदर नातं,
जोडल्यावर तुटत नसणार हे नातं ,
कधी वाटलं नव्हतं भेटू ,
अनोळखी एकमेकांना असे ..
अन जाणून घेऊ क्षणभरात सारे ,
मन जशी लख्ख आरसे ,
सुंदर निरागस
मन मोकळी हसमुख तू ,
देव जाणो, आपण किती काही जाणलं एकमेकांबद्दल ,
पण जितकं काही जाणलं तितकंच ,
आपल्या मैत्रीचं जग वाटू लागलं सुंदर …
कधी परत भेटायची वेळ मात्र आली नाही लवकर ..
कधी परत भेटायची वेळ मात्र आली नाही लवकर..
त्या वेळेची वाट बघून डोळे झाले आतुर जागर …
तेव्हाच आला क्षण जेव्हा भेटून गेलो आपण ;
भेटल्यावर सुद्धा जास्त काही सुचलं नाही …
कारण तू होती इतकी सुंदर,
पाहताच निशब्द मी सागर ;
नशिबाने जर भेट घडवली तर पुन्हा भेटू…
नशिबाने जर भेट घडवली तर पुन्हा भेटू;
दोन गोष्टी प्रेमाच्या एकमेकांसोबत बोलू …
कल्पना नाही परत येतील का हे दिवस …
पण राहिलेल्या ह्या चार दिवसात पूर्ण आयुष्य जगून पाहू,
तुझ्या लग्नाच्या आधीचे हे दिवस सोनेरी शब्दांनी लिहू ;
परत मागून हि मिळणार नाहीत,
आपले मैत्रीचे हे सुंदर दिवस…
परत मागून हि मिळणार नाहीत ,
आपले मैत्रीचे हे सुंदर दिवस…
त्यामुळे आताच जागून घेऊ प्रत्येक दिवस न दिवस …

©Sagar

0

जगावेगळं प्रेम….

tumblr_m9lst2nwdr1qcloroo1_500_large1जगावेगळं प्रेम देईन तुला ,
इतरांपेक्षा जास्त सन्मान देईल तुला ;
स्वतः पेक्षा जास्त महत्व देईन तुला …
कधी कुणाची आठवण येणार नाही,वेळो वेळी इतकी साथ देईन तुला ,
जमिनीवर राहून आकाशापेक्षा उंच स्वप्न दाखवेन तुला
आभाळात चमकणाऱ्या चांदण्याही फिक्या पडतील ,इतकी ख़ुशी देईन तुला ,
तू येऊन तरी बघ एकदा माझ्या आयुष्यात
तुला पाहून अभिमानाने चमकणारा चंद्र हि जमिनीवर येईल ,
इतकं प्रेम करेल तुला ,
इतकं प्रेम करेल तुला…

     ©Sagar

0

तुझी साथ …

भीती वाटते कि काही महिन्यात आपले लग्न होईल…लग्नानंतर मी कुठे असेन ?आणि तू कुठे असशील? ,
मग तेव्हा आपल्या या आठवणीच साथ देतील,
खूप आठवतील आपली हि व्हाट्स एप वरची चॅटिंग …
सकाळ सकाळी ते गुड मॉर्निंग चे मॅसेजेस …
एकमेकांशी शेअर केलेलया चेष्टा मस्कऱ्या ….
आणि तुझं ते सर सर म्हणून मला चिडवणं सुद्धा ;
आपल्या लग्नानंतर ह्या आठवणी डोळ्यात अश्रूंच स्थान घेतील;
देवाकडे एकच मागणं तुला सदैव खुश ठेवणारा नवरा मिळो
जो तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेल आणि न सांगताच पूर्ण करेल तुझ्या सर्व इच्छा ….
येणारे दिवस तुझ्या आयुष्यातले इतके उत्साहाने भरो कि ,पूर्ण आयुष्य कमी पडो पण हा उत्साह कधी न संपो ,
इतकं सगळं तुझ्यासाठी मागून झाल्यावर एक गोष्ट मात्र माझ्यासाठी नक्की मागेन त्या ईश्वराकडून ….
ती गोष्ट म्हणजे “हे देवा ह्या आयुष्यात तर उशिरा भेट करून दिलीस ,पण पुढल्या आयुष्यात मात्र असं नको करुस! ;
पुढ्ल्या आयुष्यात लवकर भेट करून दे म्हणजे एक एक दिवस तिचे प्रेमाने आणि खुशीने रंगवेन ;
म्हणजे एक एक दिवस तिचे प्रेमाने आणि खुशीने रंगवेन ….

©Sagar