Image
0

दोस्ती और प्यार

textgramword

Advertisements
0

नातं ..

180

Friends ->love ->friends

 

मी तू आणि आपली मैत्री,
असं हे आपल्या मैत्रीचं सुंदर नातं,
जोडल्यावर तुटत नसणार हे नातं ,
कधी वाटलं नव्हतं भेटू ,
अनोळखी एकमेकांना असे ..
अन जाणून घेऊ क्षणभरात सारे ,
मन जशी लख्ख आरसे ,
सुंदर निरागस
मन मोकळी हसमुख तू ,
देव जाणो, आपण किती काही जाणलं एकमेकांबद्दल ,
पण जितकं काही जाणलं तितकंच ,
आपल्या मैत्रीचं जग वाटू लागलं सुंदर …
कधी परत भेटायची वेळ मात्र आली नाही लवकर ..
कधी परत भेटायची वेळ मात्र आली नाही लवकर..
त्या वेळेची वाट बघून डोळे झाले आतुर जागर …
तेव्हाच आला क्षण जेव्हा भेटून गेलो आपण ;
भेटल्यावर सुद्धा जास्त काही सुचलं नाही …
कारण तू होती इतकी सुंदर,
पाहताच निशब्द मी सागर ;
नशिबाने जर भेट घडवली तर पुन्हा भेटू…
नशिबाने जर भेट घडवली तर पुन्हा भेटू;
दोन गोष्टी प्रेमाच्या एकमेकांसोबत बोलू …
कल्पना नाही परत येतील का हे दिवस …
पण राहिलेल्या ह्या चार दिवसात पूर्ण आयुष्य जगून पाहू,
तुझ्या लग्नाच्या आधीचे हे दिवस सोनेरी शब्दांनी लिहू ;
परत मागून हि मिळणार नाहीत,
आपले मैत्रीचे हे सुंदर दिवस…
परत मागून हि मिळणार नाहीत ,
आपले मैत्रीचे हे सुंदर दिवस…
त्यामुळे आताच जागून घेऊ प्रत्येक दिवस न दिवस …

©Sagar

0

तुझी साथ …

भीती वाटते कि काही महिन्यात आपले लग्न होईल…लग्नानंतर मी कुठे असेन ?आणि तू कुठे असशील? ,
मग तेव्हा आपल्या या आठवणीच साथ देतील,
खूप आठवतील आपली हि व्हाट्स एप वरची चॅटिंग …
सकाळ सकाळी ते गुड मॉर्निंग चे मॅसेजेस …
एकमेकांशी शेअर केलेलया चेष्टा मस्कऱ्या ….
आणि तुझं ते सर सर म्हणून मला चिडवणं सुद्धा ;
आपल्या लग्नानंतर ह्या आठवणी डोळ्यात अश्रूंच स्थान घेतील;
देवाकडे एकच मागणं तुला सदैव खुश ठेवणारा नवरा मिळो
जो तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेल आणि न सांगताच पूर्ण करेल तुझ्या सर्व इच्छा ….
येणारे दिवस तुझ्या आयुष्यातले इतके उत्साहाने भरो कि ,पूर्ण आयुष्य कमी पडो पण हा उत्साह कधी न संपो ,
इतकं सगळं तुझ्यासाठी मागून झाल्यावर एक गोष्ट मात्र माझ्यासाठी नक्की मागेन त्या ईश्वराकडून ….
ती गोष्ट म्हणजे “हे देवा ह्या आयुष्यात तर उशिरा भेट करून दिलीस ,पण पुढल्या आयुष्यात मात्र असं नको करुस! ;
पुढ्ल्या आयुष्यात लवकर भेट करून दे म्हणजे एक एक दिवस तिचे प्रेमाने आणि खुशीने रंगवेन ;
म्हणजे एक एक दिवस तिचे प्रेमाने आणि खुशीने रंगवेन ….

©Sagar

0

पूर्वीचे दिवस …

de4c91ebd51ed48e2d4aeec841cfcb6a

अजून  आठवतात ते पूर्वीचे दिवस
आपण भेटत होतो प्रत्येक दिवस,
जाणून बुजून तुझ्या वाटी मी येणं ,
आणि मला पाहून तुझं मनातल्या मनात लाजणं ,
हातात हात धरून धरुनी दोन गोष्टी प्रेमाच्या बोलणं ;
बोलता बोलताच आपलं भांडण होणं ,
तुझं रुसणं आणि माझं मनवण ,
तुला लांबून पाहणं आणि मी पाहताच तुझं नजर फिरवणं ,
किती मुश्किल होत तुला मनवण ;
जस जोरदार वाहत्या सागराला;
एका क्षणात थांबवणं ,
जस जोरदार वाहत्या सागराला;
एका क्षणात थांबवणं .

©Sagar